काळजी घ्या काळजाची! म्हणजेच लिव्हर ची

काळजी घ्या काळजाची! म्हणजेच लिव्हर ची

Today’s sakal

Arogya page वर

काळजी घ्या काळजाची! म्हणजेच लिव्हर ची

मानवाच्या शरीरात लिव्हर (यकृत) हा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याची अनेक कार्ये आहेत. प्रत्येक गोष्टी साठी शरीराला शक्ती देण्यापासून ते रक्ताचं शुद्धीकरणाचं  महत्त्वाचं कार्य यकृत म्हणजेच काळीज करतं.

‘लिव्हर सिर्‍हॉसिस’म्हणजे काय ?

यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत ‘लिव्हर सिर्‍हॉसिस’ असे म्हणतात.

यकृत खराब कशामुळे होते?

लिव्हर सिर्‍हॉसिसच्या 30 टक्के रुग्णांमध्ये त्याचे कारण दारूचे सातत्याने अतिसेवन हे असते. 30 टक्के लोकांमध्ये हिपॅटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’, विषाणूजन्य कावीळ किंवा काही विशिष्ट औषधांमुळे ही प्रक्रिया घडते. पॅरॅसिटॅमॉल किंवा काही पेनकिलर्स आणि इतरही काही औषधाचे अतिसेवन केल्यामुळे यकृत खराब होऊ शकते. उर्वरित रुग्णांमध्ये मात्र त्याची निश्चित कारणे सांगता येत नाहीत. तरीही मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, थायरॉइडचा त्रास आणि स्थूलता असलेल्या व्यक्तींमध्ये ‘फॅटी लिव्हर’ची समस्या निर्माण होऊ शकते.

या समस्येवर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे पर्यावसन लिव्हर सिर्‍हॉसिसमध्ये होऊ शकते.

लक्षणे कोणती?

अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले लक्षण असू शकते. दारूचे व्यसन असणार्‍यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात. यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दारूसेवनाचे प्रमाण वाढवतात. पण त्यामुळे यकृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. रक्ताच्या उलटया होणे, मूत्रपिंडावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून ‘कोमा’पर्यंतही लिव्हर सिर्‍हॉसिसच्या रुग्णांची लक्षणे जाऊ शकतात.

प्रतिबंध कसा करावा?

आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिर्‍हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.

ज्यांना मद्यपानाची सवय आहे, त्यांनी कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे.

हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’ झालेला असल्यास त्यावर वैद्यकीय सल्ल्याद्वारे नियंत्रण ठेवता येते.

 

डॉ. बिपिन विभुते,

Liver Transplant Surgeon, Sahyadri Hospitals

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Book Appointment

Open chat
Powered by